सिंधुदुर्गात रनिंग कॅम्प व प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा मानस; विल्सन की प्रॉप यांची जिल्ह्याच्या रनिंग संस्कृतीचे ब्रँड अँबेसिडर म्हणून घोषणा
सावंतवाडी,दि.११ जुलै
सिंधुदुर्ग जिल्ह्याची संस्कृती आणि येथील भाषा खरंच मला भावली या सिंधुदुर्ग जिल्हा आपलोच असा या जिल्ह्यावर प्रेम करावे असा हा जिल्हा आहे अशा शब्दात केनियाचे जागतिक कीर्तीचे धावपटू विल्सन की प्रॉप यांनी स्पष्ट केले या भागाची मराठी मालवणी बोली भाषा खरंच तिच्यात गोडवा आहे असेही ते म्हणाले .केनियामध्ये रनिंग धावणे याला फार महत्त्व आहे आणि ती त्यांची संस्कृती झाली आहे मग अशी संस्कृती रनिंग धावणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात महत्त्वाचे बनण्यासाठी.लवकरच रनिंग कॅम्प ट्रेनिंग सेंटर.उभारण्याचा आपला मानस.असून या ट्रेनिंग सेंटर मध्ये द्रोणाचार्य सारखे प्रशिक्षक आणण्यात येतील आणि त्याचीही सुरुवात म्हणजेच केनियाचे जागतिक कीर्तीचे धावपटू विल्सन की प्रॉप हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या रनिंग संस्कृतीचे ब्रँड अँबेसिडर आहेत असे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आणि केनिया येथे स्थायिक झालेले मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणारे अजित राणे यांनी स्पष्ट केले
कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग मंडळ च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात जागतिक कीर्तीचे धावपटू विल्सन की पॉप दौऱ्यावर आले आहेत त्यांचे स्वागत व त्यांचा सन्मान गौरव शाल श्रीफळ व भेटवस्तू व त्यांना कोकणी संस्कृतीचा भगवा फेटा बांधून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांच्यासोबत असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र अजित राणे यांचाही सन्मान करण्यात आला केनिया येथे मे महिन्यात महाराष्ट्र मंडळ नेरोबी केनिया आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने नैरोबी केनिया येथे दुसरे आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलन झाले या संमेलनात केनिया येथील महाराष्ट्र मंडळाने खास करून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संमेलनाचे यजमानपद स्वीकारले होते आणि तेथे मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे त्यामुळे केनिया देशाचे जागतिक कीर्तीचे धावपटू विल्सन किपॉप हे सिंधुदुर्गजिल्ह्यात आले त्याबद्दल त्यांचा सन्मान स्वागत करण्यात आले यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री विल्सन किपॉप भारावून गेले भगव्या रंगाचा डोक्यावर फेटा बांधतात शाही फेट्याने आपण भारावून गेल्याचे ते म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्याची संस्कृती आणि येथील बोलीभाषा खरोखरच मला भावली आहे येथील लोक प्रेमळ आहेत मात्र येते स्पोर्टच्या दृष्टीने खूप वाव असताना येथील तरुण याकडे वळत नाहीत त्यांनी धावण्याच्या स्पर्धेत उतरायला हवे असे ते म्हणाले
केनियामध्ये कोकणची संस्कृती जपतोययावेळी अजित राणे म्हणाले केनिया मध्ये कोकणची संस्कृती आणि मराठी भाषा अधिक प्रगल्भतेने आम्ही राबवत आहोत तेथे गणपती उत्सव एवढ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो की आम्ही जणू आमच्या कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहोत याचाच प्रत्यय येतो तेथे दिवाळी दसरा होळी असे विविध सण आणि या कोकणची संस्कृती जपली जात आहे आतापर्यंत कोकणातील अनेक मंडळींनी केनियामध्ये तेथील खाद्य संस्कृती आणि तेथील पर्यटन स्थळाचा आस्वाद घेतला आहे असे ते म्हणाले यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष मंगेश मस्के यांनी परिचय करून दिला प्रा सुभाष गोवेकर यांनी संवाद साधला या कार्यक्रमाला कोकण मराठी साहित्य परिषदेचे सचिव ॲड संतोष सावंत सहसचिव सुरेश पवार प्रा सुभाष गोवेकर जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप वालावलकर वृंदा कांबळी प्रा दिपाली काजरेकर गोविंद पवार स्वाती सावंत कोकण मराठी साहित्य परिषदेचे युवा पदाधिकारी ॲड मंदार म्हस्के आधी उपस्थित होते फोटो सावंतवाडी कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग मंडळाच्या वतीने जागतिक कीर्तीचे धावपटू विल्सन किपॉप यांचा शाल श्रीफळ व फेटा बांधून सत्कार करताना जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के बाजूला अजित राणे ॲड संतोष सावंत सुरेश पवार सुभाष गोवेकर संदीप वालावलकर वृंदा कांबळी स्वाती सावंत दिपाली काजरे कर आधी छाया मंदार म्हस्के