सावंतवाडी : कणकवलीत उद्या सामाजिक संघटनांचा आक्रोश मोर्चा सावंतवाडी समता करण्यापूर्वी चे कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचे आवाहन.

शेअर करा

सावंतवाडी,दि.२२ जुलै

सध्या देशभर नीट पेपर फुटीच्या विरोधात सर्व समाजाचे व सर्व गटातील जनतेचे दिल्लीच्या जंत र मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून काल संसद भवनावर काढण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या मोर्चावर दिल्ली पोलिसांनी लाठी चार्ज करीत अनेक विद्यार्थ्यांना जखमी केले. लोकशाही मार्गाचा वापर करीत सनदशील मार्गाने निघालेल्या या मोर्चाला बळाचा वापर करीत मोर्चा पांगविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. पोलिसांनी अनेक विद्यार्थ्यांना जखमी केले. युवाशक्तीचा लोकशाहीचा हक्क चिरडण्याचा प्रयत्नही सरकारने केला आहे. सरकारच्या हिंसक दडपशाहीच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी व या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी लोकशाही संघटनाने उद्या गुरुवारी कणकवली येथे आक्रोश रॅलीचे आयोजन केले आहे या रॅलीत येथील समता प्रेरणाभूमी संवर्धन समितीही सहभागी होणार असून कार्यकर्त्याने मोठ्या संख्येने या रॅली सहभागी व्हावे असे आवाहन समता प्रेरणाभूमीचे अध्यक्ष दीपक पडेलकर व सचिव मोहन जाधव यांनी केले आहे.

शेअर करा