सावंतवाडी : पश्चिम राजस्थानमधून नैऋत्य मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू: हवामान विभागाची अधिकृत माहिती

शेअर करा

सावंतवाडी,दि.१९ सप्टेंबर
देशभरातून मान्सून माघारी फिरण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले असून, नैऋत्य मान्सूनच्या परतीचा प्रवास अधिकृतपणे सुरू झाला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) जारी केलेल्या अखिल भारतीय हवामान सारांश व अंदाजानुसार, आज १९ सप्टेंबर २०२६ रोजी पश्चिम राजस्थानच्या काही भागांतून मान्सूनने माघार घेतली असल्याचे घोषित करण्यात आले आहे.
​हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम राजस्थानमधील वातावरणात झालेल्या बदलांमुळे मान्सूनच्या परतीसाठी परिस्थिती पूर्णपणे अनुकूल बनली होती. त्या अनुषंगाने आज राजस्थानच्या काही भागांतून मान्सून अधिकृतरीत्या माघारी फिरला आहे. आगामी काही दिवसांत देशामधून मान्सूनच्या माघारीचा वेग वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
​बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतीकामाचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन ‘ग्रामीण कृषी मौसम सेवा, मुळदे’ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा