सावंतवाडी : श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव अपूर्व उत्साहात साजरा इस्कॉन चे आयोजन

शेअर करा

सावंतवाडी,दि.०६ सप्टेंबर


सावंतवाडी इस्कॉन संस्थेच्या वतीने सावंतवाडी मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव नगरपरिषदेच्या बॅरिस्टर पै हॉल या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते.
सावंतवाडी विधानसभेचे आमदार माननीय दीपक भाई केसरकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे| हरे राम हरे राम राम राम हरे हरे|| नाम गजरामध्ये भगवान श्रीकृष्णांना अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर स्थानिक कलाकार अंकुश सांगेलकर व श्रीमती वालावलकर यांच्या सुमधुर आवाजात अभंग, वैष्णव गीते सादर करण्यात आली.
संस्थेच्या महिला वर्गाकडून नृत्य सादर करण्यात आले.


त्यानंतर पंढरपूर इस्कॉन चे श्रीमान सहस्त्रनाम प्रभुजी यांनी शिक्षक दिन, प्रभुपाद जन्मदिन, श्रीकृष्ण जन्माष्टमी, भारतीय संस्कृती, गीता भागवत याची आवश्यकता, चरित्रवान समाजाचे गरज, निराशा जीवनातून बाहेर पडण्यासाठी योग मार्ग याविषयी सुंदर संस्कृत श्लोक, संतांची वचने,कथा या माध्यमातून मार्गदर्शन केले.
यानंतर उपस्थित शिक्षकांना व्यासपीठावर आमंत्रित करून छोटासा शिक्षकांबद्दल आधार सत्कार करण्यात आला.
संस्थेच्या युवा कलाकारांनी संत सखुबाई नाटक सादर केले उपस्थित त्यांनी या नाटकाला खूप छान दात दिली .
आरती नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले.
बुक स्टॉल, स्वागत कक्ष, जाऊ देवाच्या गावा, भक्ती वृक्ष, फुड स्टॉल असे भव्य दिव्य आयोजन करण्यात आल्या होते.
संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम केलं.

शेअर करा