सावंतवाडी : आसोली शाळेत विद्यार्थी बनले शिक्षक

शेअर करा

शिक्षक दिनानिमित्त ‘विद्यार्थी बनले शिक्षक’ उपक्रम

सावंतवाडी,दि.०९ सप्टेंबर

आसोली येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक श्री नारायण विद्यामंडील क्रमांक १ येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून शाळेत ‘विद्यार्थी बनले शिक्षक’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका जबाबदारीने पार पाडत दिवसभराचे शैक्षणिक व शालेय कामकाज सांभाळले. विद्यार्थ्यांनी अध्यापनाबरोबरच वर्गातील शिस्त, नियोजन आणि विविध शालेय कामकाजाचा अनुभव घेतला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या जबाबदाऱ्या समजून घेण्याबरोबरच नियोजन, शिस्त, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित करण्याची संधी मिळाली.
यावेळी एका दिवसासाठी मुख्याध्यापिका म्हणून जबाबदारी स्वीकारून ती उत्कृष्टपणे पार पाडणाऱ्या गायत्री परब हिच्या आत्मविश्वासाचे, नेतृत्वगुणांचे व नियोजन कौशल्याचे उपस्थितांनी कौतुक केले.
“विद्यार्थी आज शिक्षक झाले असून, त्यातून उद्याचे सक्षम नेतृत्व घडण्याची ही सुंदर सुरुवात आहे,” असे उपस्थितांनी सांगितले.

शेअर करा