सावंतवाडी : तळवणे शाळा नं. १ चा स्तुत्य उपक्रम, विद्यार्थ्यांनी तयार केले सिडबॉल

शेअर करा

सावंतवाडी,दि.१५ जुलै

जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा तळवणे नं. १ च्या शाळेत विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने सीडबॉल अर्थात बीजगोळे तयार करणे हा उपक्रम राबविला.

या शाळेतील इयत्ता १ ली ते ७ वी च्या सर्व ४५ विद्यार्थ्यांनी जवळपास ८० सीडबॉल तयार करून ते शाळेजवळील जंगल भागात फेकले. या सिडबॉलसाठी फणस, काजू, चिंच इ. च्या बिया वापरण्यात आल्या.

सीडबॉल तयार करण्याचे प्रात्यक्षिक शाळेतील -शिक्षिका मनिषा राऊळ यांनी प्रात्यक्षिकासह दाखविले. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक युवराज गोसावी, उपशिक्षक बापुशेट कोरगांवकर व पालक यांचे सहकार्य लाभले.

या उपक्रमाचे आरोंदा केंद्राच्या केंद्रप्रमुख स्नेहल मुळे, आजगाव प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी गावीत यांनी कौतुक केले.

शेअर करा