सावंतवाडी:आरोंदा हायस्कूलमध्ये शिक्षकदिन उत्साहात साजरा

शेअर करा

सावंतवाडी,दि.०५ सप्टेंबर

आरोंदा येथील हायस्कूलमध्ये शिक्षकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सिद्धार्थ तांबे होते. यावेळी संस्था सचिव वासुदेव देऊलकर, संस्था सदस्य रामचंद्र कोरगांवकर, ताराचंद राठोड, चंदन गोसावी, भावना माजगावकर, सुप्रिया कोरगांवकर, दिवाल्या वसावे, श्रीकृष्ण गावडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी यादव ठाकरे, उल्हास सातोस्कर आदी उपस्थित होते.
शिक्षकदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शिक्षकांची वेशभूषा करून शिक्षकी पेशाचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.संस्था अध्यक्ष संदेश परब यांनी शिक्षक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंदन गोसावी व ताराचंद राठोड यांनी केले.यावेळी आरोंदा हायस्कूल येथे शिक्षक , पालक,ग्रामस्थांच्या उपस्थितीत शिक्षकदिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

शेअर करा