जिल्हा परिषद शाळा नं.2 चे तब्बल 14 विद्यार्थी शिष्यवृत्तीत चमकले : आराध्य आपटे जिल्ह्यात पहिला तर राज्यात नववा
सावंतवाडी,दि.०५ जुलै
सगळ्याचा जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा दृष्टीकोन हा वेगळाच असतो पण सावंतवाडीतील सुधाताई कामत विद्यामंदिर ने या जिल्हा परिषद शाळेची प्रतिमा बदलण्या चे काम केले असून लाखो रुपये खर्च करून एखाद्या खाजगी विद्यालयाला जमणार असे काम या जिल्हा परिषद शाळेने केले असून पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत तब्बल १४ विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत आणण्याचे काम केले आहे.या शाळेचा आराध्य आपटे हा जिल्ह्यात प्रथम आला तर राज्यात नववा येऊन शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. जिल्हा परिषद शाळा म्हटले कि सर्व सामान्य गरिबांची शाळा असे एक समीकरण बनले आहे पालक लाखो रूपये खर्च करून आपल्या मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून खाजगी शाळाचे उबरे शिजवता आणि जिल्हा परिषद शाळांना नाव ठेवता पण याच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी दिवस रात्र एक करत विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देत आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल केलेच पण जिल्हा परिषद शाळांची समाजातील प्रतिमा बदलण्या चे महत्वाचे काम केले आहे. कै. सौ. सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर सावंतवाडी शाळा नं. २ या शाळेच्या तब्बल १४ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करत मानाचे स्थान पटकावले आहे. शाळे च्या या अभूतपूर्व यशामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात कामत विद्यामंदिर शाळेचा डंका वाजला आहे.गुणवत्ता यादीतील यशस्वी विद्यार्थ्यांत आराध्य अमोल आपटे हा जिल्ह्यात प्रथम तर राज्यात ९ वा येण्याचा बहुमान पटकावला आहे तर जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण यादीत आलेल्या मध्ये पूर्वांग कुणाल माळगावकर पाचवा सई शिवाजी आरेकर: सातवी.सुरेश मंगेश वरक: आठवा नील पांडुरंग थोरात चौदावा श्रीशा मिहिर प्रभुदेसाई सोळावी स्वामिनी अजित कोळी ऐकणीसवा साहिल शाहू खरात वीसवा दुर्वा अजित सावंत पंचवीस वा श्रीकर मंदार शुक्ल सत्तावीसवा मैत्रेय राजाराम दळवी ३६ वा.मीरा मकरंद देसाई ३९ वी.नील प्रशांत नार्वेकर: ४२ वा. सानवी चेतन देसाई ५३ वी यांनी चमकदार कामगिरी करत शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशात मुख्याध्यापक तेजस बांदिवडेकर यांच्या सह शिक्षक रणजित सावंत ,पूजा ठाकूर,प्राची ढवळ,भावना गावडे,हेमांगी जाधव यांनी दिवस रात्र एक करत घेतलेली मेहनत कामी आल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.तसेच एका जिल्हा परिषद शाळेत ही अशी अलौकिक कामगिरी होऊ शकते हे ही यातून सिध्द झाले आहे.