सावंतवाडी : गिरणी कामगार, लालबागचा राजा आणि गणेशभक्त यांचे ऋणानुबंध

शेअर करा

सावंतवाडी,दि.२६ सप्टेंबर

मुंबईचा गिरणी कामगार, लालबागचा राजा आणि गणेशभक्त यांचे नेहमीच ऋणानुबंध घट्ट राहिले आहेत.लालबागचा राजा आणि खटाव मिलचे कामगार यांचे संबंध तर अतूट राहिले आहेत.मुंबईतील भायखळ्या मधील खटाव मिलच्या कामगारांना जेव्हा-जेव्हा असंख्य संकटातून जावे लागले आहे, तेव्हा-तेव्हा कामगारांनी फोटो फ्रेमधील लालबागच्या राजाची मनोभावे आराधना केली आहे.तेव्हा सिंहासनरुढ क्षमाशिल भावमुद्रा असलेल्या गणरायाने असंख्य भाविकांच्या मनात जगण्यावरील आत्मविश्वास रुजविला आहे.हाच प्रसाद मानून कामगारांनी आपले जीवन रहाटगाडे पुढे चालू ठेवले आहे,त्याची आठवण ठेवून दरवर्षी कामगार अनंत चतुर्दशीदिनी, दूरगावी,उपनगरात रहात असले तरी कामगार खटाव मिलच्या गेटवर एकत्र येतात आणि भ्रातृभवी लालबागच्या राजाला सचिनभाऊ अहिर यांच्या हस्ते पुष्पमाला चढवून प्रेमाने निरोप दिला ‌जातो.तो निरोप काल देण्यात आला.सचिनआहिर,सौ.संगिता अहिर,रा.मि.म.संघ सेक्रेटरी कु.ऐश्वर्या अहिर यांच्याहस्ते भक्तगणांना अल्पोपाहार वाटप करण्यात आले.मिल मजदूर संघाचा या कामात सिंहांचा वाटा आहे.तसेच पूर्वी जेकब सर्कल येथे तर आता पोदार मिलपाशी राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने भक्तगणांसाठी मोफत पाणपोई सुरू करून गणेशभक्तां विषयी आपले पूर्वपारचे नाते जतन केले गेले.या कामात सरचिटणीस गोविंदराव मोहिते आणि पदाधिकारी दिलचष्पी दाखवितात, हे विशेष होय

शेअर करा