सावंतवाडीत लाभधारकांऐवजी अन्य वापर; तीन गाळे नगरपरिषदेने केले सील

शेअर करा

श्रेयस मुंज यांच्या तक्रारीनंतर कर विभागाची सायंकाळी कारवाई; अधिकारी गोविंद गवंडे यांची माहिती

सावंतवाडी,दि.१२ ऑगस्ट

लाभधारका ऐवजी अन्य गाळे वापर असल्याच्या श्रेयस मुंज यांच्या तक्रारीवरून तीन गाळे सील केल्याची माहिती नगरपरिषदेच्या कर विभागाचे अधिकारी गोविंद गवंडे यांनी दिली. आज सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.

यामध्ये राजेश लाड, भिमाप्पा जुनेर (मयत), मधुकर साटेलकर या तिघांचे गाळे सील करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. सावंतवाडी नगरपालिकेच्या इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील हे तीन गाळे प्रशासनाकडून ‘सील’ करण्यात आले आहेत. या गाळ्यात नाशवंत माल असून त्याबाबतचा निर्णय मुख्याधिकारी घेणार असल्याचे श्री. गवंडे यांनी म्हटले आहे. दरम्यान, श्रेयस मुंज यांनी याबाबत तक्रार केली होती. १५ ऑगस्टला उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनाने केलेल्या कारवाईवर ते समाधानी नसून उपोषणाला बसण्यावर ठाम असल्याचे समजत आहे. तसेच इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील काही गाळ्यात अनधिकृत बांधकाम तसेच मोडतोड केल्याच्या तक्रारी यापूर्वी असल्याने या कारवाईनंतर नगरपरिषद प्रशासन त्याबाबत कोणत पाऊल उचलत याकडे शहरवासीयांच लक्ष लागून राहिले आहे.

शेअर करा