सावंतवाडीत १६ ते २३ जुलैदरम्यान ‘विठ्ठल रखुमाई हरिनाम वीणा सप्ताह–२०२६’ उत्साहात

शेअर करा

आषाढी एकादशी उत्सवानिमित्त विठ्ठल मंदिरात भजन, वारकरी कीर्तन व विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

सावंतवाडी,दि.१५ जुलै

प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही सावंतवाडी येथील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरात गुरुवार दिनांक १६ जुलै २०२६ ते गुरुवार दि. २३ जुलै २०२६ या कालावधीत ‘विठ्ठल रखुमाई हरिनाम विणा सप्ताह २०२६’ तसेच आषाढी एकादशी उत्सवाचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
​सप्ताहादरम्यान दररोज सायंकाळी ४ ते ६ या वेळेत महिला मंडळांचे भजन, तर रात्री ६ ते १० या वेळेत वारकरी भजन व संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
​ हरिनाम विणा सप्ताह: दैनिक कार्यक्रम पत्रिका
​गुरुवार, १६ जुलै २०२६
​रात्री ६.०० वा. – सालईवाडा भजनी मंडळ, सावंतवाडी
​रात्री ८.०० वा. – स्थानिक भजनी मंडळ, सावंतवाडी
​शुक्रवार, १७ जुलै २०२६
​रात्री ६.०० व ८.०० वा. – स्थानिक भजनी मंडळ, सावंतवाडी
​शनिवार, १८ जुलै २०२६
​रात्री ६.०० व ८.०० वा. – स्थानिक भजनी मंडळ, सावंतवाडी
​रविवार, १९ जुलै २०२६
​सायंकाळी ५.०० वा. – अभिनव संगीत विद्यालय “भक्तीरंग” (किरण सिद्धे आणि सहकारी यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम)
​रात्री ८.०० वा. – साई गणेश भजनी मंडळ, बांदा
​सोमवार, २० जुलै २०२६
​सायंकाळी ५.०० वा. – सद्गुरु संगीत विद्यालय, सावंतवाडी यांचा गायनाचा कार्यक्रम
​रात्री ८.०० वा. – स्थानिक भजनी मंडळ, सावंतवाडी
​मंगळवार, २१ जुलै २०२६
​रात्री ६.०० वा. – स्थानिक भजनी मंडळ, सावंतवाडी
​रात्री ९.०० वा. – नवार वारकरी भजनी मंडळ, भेंडमळा, वेंगुर्ला
​बुधवार, २२ जुलै २०२६
​रात्री ६.०० वा. – स्थानिक भजनी मंडळ, सावंतवाडी
​रात्री ९.०० वा. – स्थानिक भजनी मंडळ, सावंतवाडी
​गुरुवार, २३ जुलै २०२६ (सप्ताह सांगता)
​दुपारी २.०० वा. – हरिनाम विणा सप्ताह सांगता व “महाप्रसाद”
​ आषाढी एकादशी व विशेष कीर्तन सोहळा
​शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी आषाढी एकादशी निमित्त श्रींची काकड आरती व महापूजा संपन्न होईल. तसेच २५ ते २९ जुलै दरम्यान भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे:
​दि. २५ ते २७ जुलै (दररोज सायं. ६.०० वा.):
​कीर्तनकार ह.भ.प. बिलासभूबा गरवारे (कुरेली सिद्धेश्वर) यांचे सुश्राव्य कीर्तन.
​दि. २८ जुलै (सायं. ६.०० वा.):
​कीर्तनकार ह.भ.प. कु. मधुरा सावंत (माजगाव, सावंतवाडी) यांचे कीर्तन.
​दि. २९ जुलै (सकाळी १०.०० वा.):
​श्रींची पालखी भटवाडी येथील विठ्ठल मंदिरातून निघून परत फिरेल.
​दि. २९ जुलै (सायंकाळी ६.०० वा.):
​कीर्तनकार ह.भ.प. ऋदयननाथ गावडे (साळगाव) यांचे काल्याचे कीर्तन होईल व याचसोबत उत्सवाची सांगता होईल.

विठ्ठल मंदिर स्थानिक देवस्थान कमिटी व विठ्ठल मंदिर उत्सव कमिटी, सावंतवाडी यांच्या वतीने सर्व भाविकांना या सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा