सावंतवाडीत २९ सप्टेंबरला ‘रोजगार महाकुंभ’; युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

शेअर करा

टोपीवाला मेमोरियल इन्स्टिट्यूटमध्ये सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत आयोजन; विविध उद्योग व आस्थापना सहभागी होणार

सावंतवाडी दि.२६ सप्टेंबर
जयानंद मठकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावंतवाडी यांच्यावतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महा कुंभ या रोजगाराच्या मेळाव्याच्या आयोजन मंगळवार दि.२९ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ४ वाजता टोपीवाला मेमोरियल इन्स्टिट्यूट हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज सावंतवाडी या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे रोजगाराच्या विषयी संधी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित आस्थापना व उद्योग समूह सहभागी होणार आहेत या रोजगार महा कुंभामध्ये रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक युवतींनी विविध उद्योग व आस्थापना मधील उपलब्ध रोजगाराच्या संधी बाबत माहिती मिळणार असून पात्र उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे तरी सर्व संबंधितांनी उपस्थित राहावे असे प्रभारी प्राचार्य जयानंद मठकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावंतवाडी यांनी आवाहन केले आहे.

शेअर करा