​​सावंतवाडी : पतसंस्था पदाधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी २४ जून रोजी प्रशिक्षण शिबिर

शेअर करा

सावंतवाडी, दि. १८ जून
सहकारी पतसंस्था चळवळ अधिकाधिक सक्षम करण्यासाठी पतसंस्था पदाधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट दर्जाचे प्रशिक्षण देण्याचे शासनाने योजिले आहे. यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण बिगरशेती व पगारदार पतसंस्थांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
​हे प्रशिक्षण शिबिर बुधवार, दिनांक २४ जून रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी (सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रधान कार्यालयाशेजारी), ता. कुडाळ येथे होणार आहे. या प्रशिक्षणात इनकम टॅक्स प्रणाली, प्रभावी कर्ज वसुली, तसेच कर्ज वितरण धोरण या महत्त्वपूर्ण विषयांवर राज्यातील तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. हे प्रशिक्षण पतसंस्थांसाठी अत्यंत उपयुक्त असून, यासाठी प्रति प्रतिनिधी १५०० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे.
​सर्व पतसंस्थांनी हे शुल्क ‘MAHARASHTRA CO-OP DEVELOPMENT CORPORATION’, खाते क्र. ०३४००१६०००६००२३, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (आयएफएससी कोड- HDFC0CPDCCB, शाखा- Agri.College, Pune) या खात्यावर भरून नोंदणी करावी. तसेच नोंदणीची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन, सावंतवाडी यांच्या ९१३०३४३७६७ या मोबाईल क्रमांकावर कळवावी. जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांनी जास्तीत जास्त प्रतिनिधींची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्री. सुनील राऊळ यांनी केले आहे.
​जिल्हा उपनिबंधकांना निरोप :
दरम्यान, जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक डॉ. श्री. सोपान शिंदे हे सेवानिवृत्त होत असून, यानिमित्त त्यांना २४ जून रोजी संध्याकाळी ४ वाजता प्रशिक्षणस्थळी शुभेच्छा देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमालाही सर्व पतसंस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. सुनील राऊळ यांनी केले आहे.

शेअर करा