सावंतवाडी : सांगेलीत घरावर झाड कोसळून मोठे नुकसान

शेअर करा

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा; विष्णू सोमा राऊळ यांच्या घराचे नुकसान, ग्रामस्थांनी धाव घेत केली मदत.

सावंतवाडी,दि.०५ जुलै

सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील विष्णू सोमा राऊळ यांच्या घरावर झाड कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे.

सिंधुदुर्गात सध्या जोरदार पाऊस सुरू असून आज सकाळ पासून सांगेली येथे मुसळधार पाऊस सुरू असल्याने तीनच्या सुमारास जोरदार वारे सुरू झाल्याने विष्णू सोमा राऊळ यांच्या राहत्या घरावर मोठे झाड कोसळल्याने मोठे नुकसान झाले, घरातील समान नुकसान झाल्याचे समजते, तसेच अजून काही ठिकाणी घरावर झाड पडून नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ धाव घेत घरावर पडलेले झाड बाजूला करण्यास मदत केली.

शेअर करा