सावंतवाडी तालुक्यातील रस्ता बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय; प्रशासनाने तातडीने रस्ता मोकळा करण्याची ग्रामस्थांची मागणी
सावंतवाडी,दि.०५ जुलै
येथील कारिवडे-ओटवणे रस्त्यावर झाड कोसळल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन रस्ता मोकळा करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मुसळधार पावसामुळे काही भागात मोठ्या प्रमाणात पडझड, नुकसान होत आहे. कारिवडे-ओटवणे रस्त्यावर झाड कोसळल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली असून प्रशासनाने याची दखल घेऊन रस्ता मोकळा करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रवी परब यांनी केली आहे.