सावंतवाडीत तहसीलदार कार्यालयासमोर झाड कोसळले; व्यावसायिक स्टॉलचे मोठे नुकसान

शेअर करा

भिसे यांच्या घरासमोर बुधवारी सकाळी घडली दुर्घटना; सौ. भिसे यांच्या स्टॉलचे मोठे आर्थिक नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली.

सावंतवाडी, दि. ०८ जुलै

सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोरील भिसे यांच्या घरासमोर बुधवारी सकाळी अचानक झाड कोसळल्याने मोठ नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत सौ. भिसे यांचा व्यावसायिक स्टॉलचे मोठे नुकसान झाले.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे हे झाड अचानक उन्मळून पड. झाड थेट स्टॉलवर कोसळल्याने स्टॉलचे मोठे नुकसान झाले असून त्यातील साहित्याचेही नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. संबंधित यंत्रणेकडून झाड हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. परिसरातील धोकादायक झाडांची तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

शेअर करा