सावंतवाडी : संकल्प एज्युकेशन ट्रस्ट कडून सावंतवाडीत वृक्षारोपण

शेअर करा

सावंतवाडी,दि.०५ जुन
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून संकल्प एज्युकेशन ट्रस्ट च्या माध्यमातून येथील पोलीस ठाण्याच्या परिसरात सिंधुदुर्ग चे उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शर्मा यांनी पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देत निसर्गाचे सौंदर्य अबाधित राखण्याचे आवाहन केले.


यावेळी पोलिस उपनिरीक्षक प्रमोद पाटील, उपनिरीक्षक माधुरी मुळीक, ज्ञानेश्वर गवारी ट्रस्ट चे अध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सचिव राजू तावडे , कार्याध्यक्ष अनंत जाधव, अमोल टेंबकर ,पोलिस कर्मचारी अमित


पर्यावरण दिन निमित्त सर्वच ठिकाणी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात या निमित्ताने निसर्गाची होणारी हानी कमी व्हावी जास्तीत जास्त वृक्षारोपण केले जावे या उद्देशातून संकल्प एज्युकेशन ट्रस्ट कडून वृक्षारोपण करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला असून येथील पोलिस ठाण्याच्या परिसरात उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांच्या उपस्थितीत हे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी शर्मा यांनी उपक्रमास शुभेच्छा देत असेच उपक्रम घ्या आपली नेहमीच साथ असेल असे त्यांनी स्पष्ट केले.व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.
तर पोलिस अधिकाऱ्यांनी उपक्रमाचे कौतुक केले.आज खऱ्या अर्थाने वृक्षारोपण करण्याची गरज असल्याचे सांगून प्रत्येकाने वृक्षारोपण करावे असे आवाहन केले.

शेअर करा