सावंतवाडी : देवसू मधलीवाडीत दोन बंद घरांमध्ये चोरी

शेअर करा

तांबा-पितळेची भांडी लंपास; १४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल

सावंतवाडी,दि.१० ऑगस्ट
देवसु मधलीवाडी येथील दोन बंद घरे फोडून चोरट्यांनी तांबा पितळेची भांडी चोरून नेली. एकूण चौदा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला असून ही घटना गेल्या आठ दिवसांपूर्वी घडली आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


देवसू मधलीवाडी येथील दोन घरे बंद असल्याने चोरट्यांनी त्या घराना लक्ष केले. घरांचा दरवाजाचे कडी कोयंडे तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या हाती काहीच रक्कम न लागल्याने त्यांनी घरातील तांबा पितळेची भांडीचा ऐवज चोरून नेला. एकूण चौदा हजार पाचशे रुपयांची भांडी चोरीस गेली आहेत. ही घटना गेल्या आठ दिवसांच्या कालावधीत घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले. सोमवारी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास आंबोली पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस मनीष शिंदे करत आहेत.

शेअर करा