सावंतवाडी : आमदार दीपक केसरकर यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ल्यात विविध सामाजिक उपक्रम

शेअर करा

शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग; १८ जुलै रोजी संपर्क कार्यालयात केक कापून वाढदिवस साजरा होणार

सावंतवाडी, दि. १७ जुलै
आमदार दीपक केसरकर यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले तालुक्यात विविध सामाजिक व विधायक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व उपक्रमांमध्ये शिवसेना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवत आहेत. दरम्यान, उद्या शनिवार, दि. १८ जुलै रोजी सकाळी ठीक १० वाजता आमदार दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी वाढदिवसाच्या विविध उपक्रमांचे नियोजन केले आहे. आज नगरपरिषद सफाई कर्मचाऱ्यांना धान्य वाटप करण्यात आले.
​”सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या आशिर्वादामुळेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते हा वाढदिवस साजरा करत आहेत, मी स्वतः प्रत्यक्षात वाढदिवस साजरा करत नाही,” अशी भावना आमदार दीपक केसरकर यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
​उद्या शनिवारी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमापूर्वी सकाळी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्या पुढाकाराने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा ॲड. निता कविटकर यांच्या वतीने रुग्णांना फळवाटप करण्यात येणार आहे.
​या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला तालुक्यात शिवसेना समन्वयक सचिन वालावलकर यांनी, तर दोडामार्ग तालुक्यात पंचायत समितीचे उपसभापती गणेशप्रसाद गवस यांनी विविध सामाजिक व जनहितार्थ उपक्रम हाती घेतले आहेत. संपूर्ण मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये या वाढदिवसानिमित्त मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
बेळगांव येथील के इ ली रुग्णालयाच्या मदतीने जिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने उपजिल्हा रुग्णालयात शिवसेनेच्या वतीने सर्व आजारांवर उपचार करणारे महा आरोग्य शिबीर सोमवार दि.२० जुलै रोजी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सर्व जनतेला आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. हृदय रोग, कॅन्सर पासून सर्व प्रकारच्या आजारांची तपासणी, उपचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

शेअर करा