Sawantwadi :पर्यावरण रक्षणाचा संदेश देत वसुंधरा पायी दिंड्यांचे नाणीजधामकडे प्रस्थान

शेअर करा

नागपूर, तेलंगणा, मराठवाडा, नाशिक, मुंबई, पुणे आणि गोव्यातून दिंड्या मार्गस्थ; २१ ऑक्टोबरला जगद्गुरू नरेंद्राचार्यजींच्या जन्मोत्सवासाठी नाणीजधाम येथे होणार आगमन

सावंतवाडी,दि.११ ऑक्टोबर

जय सियाराम
पर्यावरण रक्षणाचा संदेश जनमानसात पोचवण्याच्या पवित्र हेतूने रामानंद संप्रदायाच्या वेगवेगळ्या उपपिठांवरून वसुंधरा पायी दिंडी श्री क्षेत्र नाणीजधाम रत्नागिरी च्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत .
नागपूर, तेलंगणा, मराठवाडा, नाशिक, मुंबई, पुणे आणि गोवा या ठिकाणाहून या दिंड्या निघालेल्या आहेत.
21 ऑक्टोबर 2026 रोजी श्रीमद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या जन्मोत्सवादिवशी या सर्व दिंड्या श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे पोहोचणार आहेत.


उपपीठ गोवा येथून निघालेल्या वसुंधरा पायी दिंडीचे आगमन सोमवार दिनांक 12 ऑक्टोबर 2026 रोजी बांदा येथे होणार आहे. तसेच रात्रीच्या मुक्कामासाठी खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांदा येथे ही दिंडी थांबणार आहे.
तरी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे दर्शन घेण्यासाठी जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन रामानंद संप्रदाय जिल्हा सेवा समिती सिंधुदुर्ग यांच्यामार्फत करण्यात येत आहे.

शेअर करा