सावंतवाडी : विद्या विहार इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांकडून प्रशालेच्या वर्गखोलीला सुसज्ज सीलिंग

शेअर करा

सावंतवाडी, दि. ०८ जुलै

आजगाव येथील विद्या विहार इंग्लिश स्कूल या प्रशालेच्या इयत्ता दहावी १९९७ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेप्रती असलेली कृतज्ञता जपत प्रशालेतील एका वर्गखोलीत अत्याधुनिक पद्धतीचे सुसज्ज असे सीलिंग बसवून त्यात लाइट्स , फॅन यांची सोय केली. या उपक्रमामुळे वर्गखोलीचे सौंदर्य वाढण्याबरोबरच विद्यार्थ्यांना अधिक आनंददायी व दर्जेदार शैक्षणिक वातावरण उपलब्ध झाले आहे.
माजी विद्यार्थ्यांनी स्वखर्चातून हा उपक्रम राबवून आपल्या शाळेच्या विकासात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या या कार्याचे प्रशालेचे मुख्याध्यापक उत्तम भागीत , शिक्षक,पालक यांनी कौतुक करून आभार व्यक्त केले.

यापूर्वीही या प्रशालेच्या विविध माजी विद्यार्थी बॅचकडून प्रशालेसाठी विविध विकासकामे करण्यात आली असून, त्याच परंपरेत १९९७ बॅचनेही हा उपक्रम हाती घेत हे काम पूर्ण करून दिले.

या वर्गखोलीच्या उद्घाटन प्रसंगी म्हापसा गव्हर्मेंट आयटीआय चे प्राचार्य सुभाष रेडकर, शाळा समिती अध्यक्ष अण्णा झांट्ये,केंद्रप्रमुख संजीवनी कोकितकर,माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष गजानन काकतकर,प्रसाद सांगुडकर,प्रशांत सावंत,माजी केंद्रप्रमुख विलासानंद मठकर,शिक्षक पालक उपाध्यक्ष सानिका तिरोडकर,शिक्षक पालक सहसचिव हेमंत आडारकर, माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष दिनानाथ काळोजी, मोहन पांढरे, डीएड कॉलेज चे मारुती कांबळे,तुंगार सर ,प्रसाद मेस्त्री,बाळकृष्ण हळदणकर,प्रमोद पांढरे,प्रसाद मेस्त्री,वासुदेव सावंत, प्रविण मुळीक,भगवान पांढरे,सचिन आपटे उपस्थित होते.

माजी विद्यार्थ्यांच्या या योगदानामुळे इतर माजी विद्यार्थ्यांनाही शाळेच्या विकासासाठी पुढे येण्याची प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

शेअर करा