सावंतवाडी : कारिवडेत घनकचरा प्रकल्पाऐवजी मैला टाकला जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

शेअर करा

सावंतवाडी नगरपरिषदेवर संताप; “शहरातील लोक माणसं आणि ग्रामीण भागातील लोक कोण?” असा ग्रामस्थांचा सवाल

सावंतवाडी,दि.१४ जून

घनकचरा प्रक्रिया प्रकल्प केंद्रासाठी सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून कारिवडे येथील जागेची निश्चित करण्यात आली. मात्र, आता या भागात चक्क शहरातील नागरिकांचा मैला आणून ओतला जातो आहे असा आरोप येथील स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. शहरातील लोक माणसं अन् ग्रामीण भागातील लोक कोण ? असाही सवाल त्यांनी प्रशासनाला केला आहे.

घनकचरा व्यवस्थापनासाठी ही जागा निवडण्यात आली होती. मात्र, आता या ठिकाणी शहरातील नागरिकांचा मैला, सांडपाणी आणून ओतल जात आहे. या प्रकल्पाच्या आजूबाजूला वस्ती असून लोक राहत आहेत याचाही विचार केला गेला नाही. की केवळ शहरातील लोक माणसं आहेत, ग्रामीण भागात लोक माणसं राहत नाही का ? असा संतप्त सवाल कारिवडे ग्रामस्थांनी केला आहे.

याबाबत नगरपरिषद आरोग्य विभागाला विचारल असता, घनकचरा प्रकल्पाच्या येथील सांडपाण्याचा प्लांट बंद असल्याने काहीकाळ अडचण आली होती. त्यामुळे दोन ट्रीप तिथे टाकल्या गेल्यात. मात्र, आता प्लांट दुरूस्त झाल्याने त्या ठिकाणी ही घाण टाकली जाणार नाही. तात्पुरत्या स्वरूपात तिथे हे सांडपाणी टाकल गेलं होत, आता टाकलं जाणार नाही. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाजवळ बायोगॅस प्रकल्पाशेजारी या मैलापासून खत निर्मिती केली जाते. दुरूस्तीवेळी हा प्लांट रिकामी करण्यात आला होता‌‌. उन्हाळ्यात ते करण शक्य होत. मात्र, आता प्लांट दुरूस्ती झाल्याने ही गैरसोय होणार नाही अशी माहिती नगरपरिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

शेअर करा