सावंतवाडी ,दि.०६ ऑगस्ट
भारतीय जनता युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये माडखोल येथील भाजपचे कार्यकर्ते विनेश तावडे यांची भाजयुमोच्या आंबोली मंडल अध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे.
भाजयुमोचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संदिप चंद्रकांत मेस्त्री यांनी विनेश तावडे यांना नियुक्तीचे अधिकृत पत्र प्रदान केले असून ही निवड तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली असल्याचे पत्रात नमूद केले आहे. विनेश तावडे यांच्या नेतृत्वामुळे आंबोली मंडल परिसरात भाजप संघटन अधिक मजबूत आणि गतिशील होईल, असा विश्वास या वेळी पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला.
या नियुक्ती कार्यक्रमाला भाजप व भाजयुमोचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये भाजयुमो जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, सरचिटणीस संतोष पुजारे व जावेद खतीब, उपाध्यक्ष सिद्धेश रावराणे व राकेश सावंत, मालवणचे नगरसेवक ललित हरी चव्हाण, जिल्हा चिटणीस देवेंद्र शेटकर, कुडाळ युवा मोर्चा उपाध्यक्ष जयेश चिंचळकर व प्रसाद कृष्णा पाटकर, कुडाळ युवा अध्यक्ष तन्मय वालावलकर, मयूर राणे, सावंतवाडी युवा अध्यक्ष हितेश नाईक, परेश कांबळी, सागर पवार, शुभम परब, कणकवली युवा अध्यक्ष सर्वेश दळवी, देवगड भाजप अध्यक्ष अतुल सरवटे, कणकवली भाजयुमो सरचिटणीस प्रशांत राणे, कणकवली शहराध्यक्ष सागर राणे, युवा तालुकाध्यक्ष सहदेव खाडे, नयन दळवी तसेच बांदा पक्ष युवा अध्यक्ष सिद्धेश कांबळी आणि पराशर सावंत यांसह पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आंबोली मंडल अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विनेश तावडे यांचे भाजपच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह स्थानिक कार्यकर्ते, ग्रामस्थ व नागरिकांकडून जोरदार स्वागत करण्यात येत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.