सावंतवाडी : “गोविंदा”च्या जयघोषात विशालजी परब यांचे श्रीकृष्ण दर्शन

शेअर करा

सावंतवाडीत भक्तिमय वातावरण

सावंतवाडी,दि.०५ सप्टेंबर

जन्माष्टमीनिमित्त भाजप युवानेते विशाल परब यांनी सावंतवाडी शहरातील विविध ठिकाणी श्रीकृष्णाचे दर्शन घेतले.
यावेळी त्यांनी सावंतवाडी येथील पुरातन मुरलीधर मंदिरात जाऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. तसेच शहर मंडल अध्यक्ष तथा आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, क्रीडा सभापती आनंद नेवगी, ओबीसी मंडल अध्यक्ष धिरेंद्र म्हापसेकर आणि नगरपालिका आरोग्य अधिकारी दिपक म्हापसेकर यांच्या घरी जाऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेतले.यावेळी त्यांच्यासमवेत केतन आजगांवकर, श्रीकांत राजाध्यक्ष आदी उपस्थित होते.

शेअर करा