​​सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख नद्यांची पाणी पातळी नियंत्रणात; दक्षिण कोकण पाटबंधारे विभागाचा अहवाल

शेअर करा

सावंतवाडी,दि.०३ जुलै

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख नद्यांची पाणी पातळी सध्या सुरक्षित पातळीवर असून कोणतीही नदी धोका किंवा इशारा पातळीच्या जवळ पोहोचलेली नाही. दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी (कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग ओरोस) यांच्या वतीने आज, शुक्रवार दि. ३ जुलै रोजी दुपारी ४ वाजेपर्यंतची जिल्ह्यातील ५ प्रमुख नद्यांची सांख्यिकीय माहिती जाहीर करण्यात आली आहे.
​अहवालानुसार जिल्ह्यातील नद्यांची सद्यस्थिती:
​तिलारी नदी: तिलारीवाडी येथील मोजणी केंद्रावर आजची पातळी ३७.५२० मीटर नोंदवली गेली आहे. (इशारा पातळी: ४१.६०० मी., धोका पातळी: ४३.६०० मी.)
​तेरेखोल नदी: इन्सुली चेकपोस्ट पूल येथे आजची पातळी २.१०० मीटर आहे. (इशारा पातळी: ४.२६० मी., धोका पातळी: ६.२६० मी.)
​कर्ली नदी: कुडाळ (भंकसाळ नदी पूल) येथे आजची पातळी ४.००० मीटर नोंदवली आहे. (इशारा पातळी: ९.९१० मी., धोका पातळी: १०.९१० मी.)
​गडनदी: कणकवली-वागदे (NH- ६६ पूल) येथे आजची पातळी ३४.९०० मीटर आहे. (इशारा पातळी: ३६.७६४ मी., धोका पातळी: ३७.९२० मी.)
​वाघोटन नदी: खारेपाटण पूल येथे आजची पातळी ४.५०० मीटर इतकी आहे. (इशारा पातळी: ८.५०० मी., धोका पातळी: १०.५०० मी.)
​सध्या सर्व नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा बरीच खाली असल्याने पूरस्थितीचा कोणताही धोका निर्माण झालेला नाही.

शेअर करा