Sawantwadi : सावंतवाडी पालिकेचे पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांचा राजीनामा

शेअर करा

पाणीपुरवठा विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे प्रतिमेला धक्का बसत असल्याचे सांगत नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांच्याकडे राजीनामा सुपूर्द

सावंतवाडी,दि.९ ऑक्टोबर
येथील नगरपालिकेचे नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती प्रतिक बांदेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांच्याकडे सादर केला. पाणीपुरवठा विभागातील भ्रष्टाचारावरून आपणावर होणारे चुकीचे आरोप आणि त्यामुळे माझ्या प्रतिमेला लागणारे डाग लक्षात घेता आपण हा राजीनामा दिल्याची घोषणा आजच्या पालिकेच्या मासिक बैठकीत केली.
सावंतवाडी नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामध्ये भ्रष्टाचार झाल्या प्रकरणी शिवसेनेचे नगरसेवकांनी गेल्या काही दिवसांपासून आवाज उठवला होता. यातून या विभागाचे जोडारी कर्मचारी भारत लाखे यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांनी मागच्या मासिक बैठकीमध्ये या प्रकरणाचे नैतिक जबाबदारी स्वीकारून पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सभागृहाकडे केली होती. त्यातच दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या पाणीपुरवठा विभागाचे जोडारी भारत लाखे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यात त्यांनी गंभीर आरोप करत आपल्याला न्याय न मिळाल्यास कुटुंबासह आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता.
याच पार्श्वभूमीवर आज पालिकेच्या मासिक बैठकीच्या सुरुवातीलाच शिंदे शिवसेनेचे नगरसेवेक तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी भारत लाखे यांच्या व्हिडिओचा संदर्भात पाणीपुरवठा सभापतीच्या राजीनाम्याचे काय झाले असे विचारणा केली, जोपर्यंत राजीनामा घेत नाही तोपर्यंत आम्ही सभागृहात बसणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली यावेळी एकच गोंधळ उडाला मात्र नगराध्यक्षांनी हा विषय आता घ्यायचा नाही आहे असे म्हणतात शिंदे शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी सभा त्या करत पालिकेच्या प्रवेशदरावर ठ्ठिय्या केल्या. सभापती बांदेकर यांचा राजीनामा घ्यायलाच हवा असे जोरदार घोषणाबाजी त्यांनी करत पालिकेवर भ्रष्टाचाराचा आरोप केला पालिकेच्या इतिहासात असा भ्रष्टाचार आम्ही कधीच पाहिला नाही सर्वच विभागात भ्रष्टाचार वाढला आहे असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान शिवसेनेच्या नगरसेवकांनी केलेल्या सभात्याग हा कायद्याला धरून नाही आहे त्यामुळे सभागृहाचा अवमान केलेल्या सर्व नगरसेवकांवर जिल्हाधिकारी यांनी कारवाई करावी अशी मागणी प्रशासनाने करावी अशी मागणी त्यांनी केली तर यापुढे असे प्रकार आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांनी दिला तर महत्त्वाचे विषय असतात त्याचवेळी शिंदे शिवसेनेचे नगरसेवक पळ काढतात असा आरोप आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनी केला.
दरम्यान या सर्व घडामोडीनंतर बैठकीच्या शेवटी सभागृहातच पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी आपल्या राजीनामेची घोषणा केली.
श्री बांदेकर म्हणाले, पाणीपुरवठा विभागातील भ्रष्टाचारावरून आपल्यावर चुकीचे आरोप होत आहेत विरोधकांनी या मुद्द्यावरून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे यामुळे माझ्या प्रतिमेला डाग लागण्या सोबतच माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे यामुळे आपण दोन दिवसापूर्वीच नगराध्यक्षांकडे माझा राजीनामा सुपूर्त केला आहे. मी सभापती पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मागच्या दोन महिन्यात 17 लाखाच्या बिलासंदर्भात एक प्रस्ताव समिती समोर आला होता त्यानंतर त्या सूत्र लाखाचे बिल रोखण्याचा प्रयत्न माझ्यासह माझ्या समितीच्या सर्व सदस्यांनी केला त्यानंतर 17 लाखाच्या बिलाचा हिशोब मागण्याचा मी प्रयत्न केल्यानंतर माझ्यावर बिन बुडाचे आरोप करण्यात आले एकूणच यामुळे माझ्यासह माझ्या पक्षाच्या प्रतिमेला कुठेतरी गालबोट लागत असल्याचे माझ्या लक्षात आले मी माझे चारित्र्य जपतो त्यामुळे माझ्या चारित्र्याला डाग लागत असल्याने मी आज राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. मी नगरसेवक म्हणून माझ्यावर मध्ये लोकांची कामे करत राहील असे त्यांनी स्पष्ट केले.

शेअर करा