सावंतवाडी : नगरसेवक आहेत तरी कुठे?; आशिष सुभेदारांचा संतप्त सवाल

शेअर करा

रस्ते, पाणी व पथदिव्यांच्या समस्यांवरून शिवसेनेची टीका; मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी उत्तर द्यावे, अशी मागणी.

सावंतवाडी ,दि.२३ जून

सावंतवाडी शहरात सध्या प्रत्येक प्रभागाची रस्त्यांची पाण्याची लाईटची अवस्था पाहता तब्बल पाच वर्षानंतर प्रत्येक प्रभागात दोन नगरसेवक जनतेने निवडून दिले हे लोकप्रतिनिधी सध्या कुठे दिसतच नाहीत मग नेमके हे आहेत तरी कुठे असा सवाल आता जनतेला वाटत आहे जनतेचा सेवक हा असा हवा की त्याने आपल्या प्रभागातील प्रत्येक समस्या आपलं घर कुटुंब समजून सोडवायला हव्यात पण आज सावंतवाडी शहरात प्रत्येक प्रभागात रस्त्यांची झालेली खोदाई मुळे वाहन चालवणे पायी जाणे अत्यंत जिकरीचे झाले आहे प्रशासन गेली पाच वर्ष सुसेगात होते आणि आता जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी ही सावंतवाडी शहरात पावसाळा सुरू झाल्यानंतर दिसतच नाहीत हे सर्व नगरसेवक थंडगार झाले की काय मुख्याधिकारी विनायक औंधकर व नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोसले याचे उत्तर देतील का असा सवाल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे आशिष सुभेदार यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे स्पष्ट केले आहे

ते म्हणाले सावंतवाडी शहरात सध्या अनेक समस्या आहेत रस्ते पाणी वीस पुरवठा सुरळीत नाही डास प्रादुर्भाव तर वाढला आहे असे असताना कुणाचाच लक्ष नाही किंवा हे प्रश्न सोडवण्यासाठी गेले काही दिवस नगरसेवक कुठे आपल्या प्रभागात दिसतही नाहीत अशा जनतेची आमच्याकडे तक्रारी आले आहेत मग हे नगरसेवक गेले कुठे ते गायब झाले आहेत का त्यांचा शोध घेऊन ते नेमके गेलेत कुठे याची जाहीरपणे पालिका प्रशासन व सत्ताधारी यांनी स्पष्ट करावे असे ते म्हणाले ते पुढे म्हणालेसावंतवाडी
खासकीलवाडा व न्यू खासकीलवाडा प्रभागातील रखडलेल्या विकासकांमाबाबत शिवसेना उबाठा कार्यकर्ते आशिष सुभेदार यांनी आवाज उठविल्यानंतर नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सुभेदार यांनी दिलेल्या इशारा नंतर प्रभागातील विकासकामाना सुरुवात करण्यात आली आहे.


खासकीलवाडा व न्यू खासकीलवाडा प्रभागात सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवक यांच्यात गटबाजी असल्यामुळे अनेक कामे ठप्प झाली होती त्यात ठेकेदार व प्रशासनाच्या चुकीमुळे अर्धवट स्थितीत तसेच निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने ऐन उन्हाळी हंगामात नागरिकांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ठिकठिकाणी पाईप लाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्यात नगरसेवक यांच्यातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याने त्याचा फटका या प्रभागातील विकासकामांवर होत आहे. असा आरोप शिवसेना ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आशिष सुभेदार यांनी केला होता तर प्रसंगी याला प्रशासन जबाबदार असल्याचे ही त्यांनी म्हटले होते. अनेक विकासकामे यांचे टेंडर वर्क ऑर्डर झाली मात्र कामे सुरू करू नये असे आदेश पालिकेतून आल्याने ही कामे रखडली होती. आता पावसाळा जवळ आला विकासकामे तसेच पाइप लाइनची कामे पूर्ण होणार कधी असा सवाल सुभेदार यांनी केला. कचऱ्याची दुर्गंधी, लाइन वरील झाडी तोडणे, स्ट्रीट लाईन ची कामे, अर्धवट गटार बांधकाम हे प्रमुख कामे रखडली आहेत तर खोदाई देखील चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. या प्रभागात स्थानिक नगरसेवक निवडून दिले आहेत मात्र ते गटबाजीतच गुंतल्याने याचा परिणाम स्थानिक विकासकामांवर होत आहे. काही कामे पूर्ण न झाल्यास पावसाळ्यात पाणी तुंबून लोकांच्या घरात पाणी जाण्याची शक्यता आहे त्यामुळे ही कामे न झाल्यास स्थानिक नागरिकांना घेऊन मुख्याधिकारी याना घेराव घालण्याचा इशारा आशिष सुभेदार यांनी दिला होता. या इशारा नंतर पालिका प्रशासन जागे झाले आहे. त्या इशाऱ्यानंतर पालिकेकडून जोमाने विकासकांमाना सुरुवात करण्यात आली आहे. तसेच प्रशासनाला गांभीर्य नसल्याने चुकीच्या खोदाई मुळे ज्युस्तीन नगर येथे शनिवारी पाइपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले. ही घटना जुस्तीननगर कमानी समोर घडली. पाणी टंचाई असताना अशी घटना घडणे नागरिकांच्या हिताचे नाही त्यांना त्रास देण्याचे प्रकार आहेत असा आरोप देखील करत प्रशासनाने व ठेकेदाराने यावर गांभीर्याने लक्ष द्यावे. पुन्हा असा प्रकार घडू नये याचे गंभीर्याने प्रशासनाने लक्ष द्यावे पाणी समस्या गंभीर असल्याने संतप्त नागरिकांना घेऊन नगरपरिषदेवर घागर मोर्चा काढू असा इशारा ठाकरे गटाचे कार्यकर्ते आशिष सुभेदार यांनी दिला आहे.

शेअर करा