सावंतवाडी : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जमीन घोटाळे उघडकीस आणण्याची वल्गना करणारे संजू परब आता शांत का ?

शेअर करा

मनसे जिल्हाध्यक्ष ॲड* अनिल केसरकर यांचा *शिवसेना जिल्हाध्यक्ष परब यांना सवाल.

सावंतवाडी,दि.३० सप्टेंबर
सावंतवाडी विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत तत्कालीन अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या उमेदवाराविरुद्ध पत्रकार परिषद घेऊन अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष संजू परब यांनी केले होते हा उमेदवार जमिनींचा दलाल असून याने शेतकऱ्यांना फसवून त्यांच्या जमिनी कवडीमोल दराने खरेदी केल्या व याच जमिनी नंतर कोट्यवधी रुपयांना दिल्ली, नोयडा, हरियाणा येथील धनदांडग्या परप्रांतीय व्यक्तींना विकून कोट्यवधी रुपये कमावले असा आरोप यावेळी करण्यात आला होता. आपल्याकडे अनेक पुरावे असून हे सर्व पुरावे आपण योग्यवेळी उघड करू अशी वल्गना देखील संजू परब यांनी केली होती. मग शासन स्तरावरून नियुक्त करण्यात आलेली चौकशी समिती. जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात जेव्हा या व्यवहारांची चौकशी करण्यासाठी आली होती तेव्हा हे सर्व पुरावे या समितीला का देण्यात आले नाहीत याची माहिती संजू परब यांनी जनतेला दयावी. संजू परब यांनी अशी माहिती पुराव्यांसह उघड केली असती तर जनतेला देखील परप्रांतीय लोकांच्या घशात आपल्या जमिनी कोण घालत आहे याची खात्री पटली असती असे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष ॲड अनिल केसरकर यांनी केले आहे. स्थानिक गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने खरेदी करून तसेच अनेकदा त्या खरेदी करताना गोलमाल करून त्याच जमिनी परप्रांतिय धनदांडग्या लोकांना विक्री करून त्यातून कोट्यवधी रुपयांची माया जमा करणारे काही राजकीय पक्षाचे पुढारी सामाजिक कार्याचा आव आणत फिरत आहेत अशी चर्चा संपूर्ण मतदार संघात जनतेमध्ये असताना आपण केलेल्या घोषणेप्रमाणे या कथित लोकांची नाव जनतेसमोर व चौकशी समितीसमोर उघड करण्याची संधी असताना ती संधी गमावून केवळ निवडणुकीच्या तोंडावर वातावरण निर्मिती करणाऱ्या व जनतेला अंधारात ठेवणाऱ्या संजू परब यांनी आता तरी या जमीन खरेदी विक्री व्यवहारांमध्ये कोण कोण आहेत यांची नावे एकदा जाहीर करून टाकावीत असे आवाहन मनसे तर्फे करण्यात येत असल्याचे ॲड अनिल केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.

शेअर करा