सावंतवाडी : यश चंद्रशेखर जाधव परदेश दौऱ्यावर रवाना मान्यवरांकडून शुभेच्छा.

शेअर करा

सावंतवाडी,दि.०१ ऑक्टोंबर

आरोंदा गावचे सुपुत्र तथा रेडी हायस्कूलचे सेवानिवृत्त प्रभारी मुख्याध्यापक व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी चंद्रशेखर मोहन जाधव यांचा सुपुत्र यश याची फिजी आयलँड या देशातील एका नामवंत खाजगी कंपनीत (एफ एम एफ फुड्स लिमिटेड) उच्च पदावर निवड झाल्याने त्याला शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम नुकताच आरोंदा येथे पार पडला . यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष दिलीप जाधव, मिलिंद नेमळेकर, ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते मोहन जाधव, वासुदेव जाधव, कांता जाधव, मंगेश कदम ,एम एल जाधव, बुधाजी कांबळे ,सुनील जाधव, गौतम कांबळे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी जाधव, मानसी कदम, ममता जाधव ,पल्लवी जाधव, गौतमी कांबळे, अश्विनी जाधव, जिवाजी जाधव, प्राची जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.यश याचे शिक्षण बी. टेक. मेकॅनिक पर्यंत डी के टी ई सोसायटीज टेक्स्टाईल अँड इंजीनियरिंग इन्स्टिट्यूट, इचलकरंजी या विद्यालयातून झालेले असून त्यांनी त्यांनी अहमदाबाद गुजरात येथील थरमॅक्स नामांकित कंपनीत सर्विस इंजिनियर म्हणून काम केले आहे. आता त्याची निवड फिजी आयलँड येथील एफ एम एफ फुड्स लिमिटेड कंपनीत UTI मॅनेजर या पदावर नियुक्ती झाली आहे .त्याच्या कौतुकास्पद निवडीचे बौद्ध महासभा व जिल्ह्यातील आंबेडकर चळवतील कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.यावेळी यश याचा मोहन जाधव यांच्या हस्ते सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

शेअर करा