शिरगाव : माजी विद्यार्थ्यांची शाळेप्रती कृतज्ञता; चव्हाण कुटुंबीयांकडून ५० हजारांची देणगी

शेअर करा

देवगड,दि.१८ सप्टेंबर

शिरगाव पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इमारत नूतनीकरणासाठी माजी विद्यार्थी डॉ. विवेक चव्हाण, त्यांचे बंधू श्री. सुनील चव्हाण व भगिनी श्रीमती शुभलक्ष्मी चव्हाण यांनी कुटुंबीयांच्या वतीने ५० हजार रुपयांचा धनादेश शाळेस सुपूर्द केला.

शाळेच्या इमारत नूतनीकरणासाठी माजी विद्यार्थ्यांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद हा संस्थेच्या कार्यावरील विश्वासाची पावती ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी देणगीचा पारदर्शकपणे उपयोग होत असल्याचा विश्वास व्यक्त करत चव्हाण कुटुंबीयांनी शाळेच्या विकासासाठी योगदान दिले.

यावेळी सरचिटणीस श्री. रघुनाथ चव्हाण, उपाध्यक्ष श्री. संभाजी साटम, श्री. गणपत तावडे, शिरगाव शाळा समितीचे चेअरमन श्री. विजयकुमार कदम, मानद अधीक्षक श्री. संदीप साटम, कार्यकारिणी सदस्य श्री. हेमंत देसाई, श्री. मिलिंद साटम, श्री. पंडित तावडे, श्री. अमित साटम, शाळा समिती सदस्य श्री. विश्राम लोके तसेच प्रभारी मुख्याध्यापक श्री. उदयसिंग रावराणे उपस्थित होते.

माजी विद्यार्थ्यांच्या या योगदानामुळे शाळेच्या विकासाला बळ मिळत असून, शाळेशी असलेले त्यांचे ऋणानुबंध पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत.

शेअर करा