भेसळयुक्त मोदक , दुध , फळे विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर ; भेसळयुक्त खाद्यपदार्थांमुळे हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये झाली वाढ
सिंधुदुर्ग,दि.१० सप्टेंबर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध मटका , जुगार , दारु विरोधात कठोर भूमिका आमची आहे. त्याच धर्तीवर अन्न व औषध प्रशासनाची 3 पथके करण्यात आली आहेत. नागरिकांनी सतर्क राहून फळे , दुध , मोदक खरेदी करावीत. जिथे भेसळयुक्त खाद्यपदार्थ किंवा फळे , दूध विक्री होत असेल तर तात्काळ आम्हाला कळवा. जाग्वार लायसन रद्द करण्यात येईल. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरु आहे. गणेशोत्सव हा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन 24 तास अलर्टवर असणार असल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.
कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते, सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांचा व्हॉट्स अप ग्रुप आहेत. तसेच नगरविकास , एसटी यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे सर्व अधिकारी ग्रुपच्या माध्यमातून माझ्या नेहमी संपर्कात आहेत, त्यामुळे कुठलाही प्रश्न मला समजल्यानंतर तात्काळ फोटो मी त्या ग्रुपवर शेअर करतो. त्यामुळे तातडीने त्यावर निर्णय होत आहेत. त्यासाठी वेगळा फोन करण्याची गरज भासत नाही. तुमच्या इथे मग तुमच्याकडून मला माहिती आली किंवा तुम्ही बातमी केली तर ती बातमी तुम्हाला न कळवता मी दखल घेतो आणि डायरेक्ट त्या त्या संबंधित डिपार्टमेंट कडे मी पाठवून देतो. तुम्हाला एकंदरीत या जिल्ह्यामध्ये जे काही प्रशासन पळताना दिसत आहे. आज चौथ्या गेअरवर जे प्रशासन दिसतंय ना ! कारण हे आहे, पालकमंत्री म्हणून मी शाश्वतीने त्यांच्यावर दुर्बीण घेऊन बसलेलो आहे. प्रशासनाला कालच्या आढावा बैठकांमध्ये 25 सप्टेंबरपर्यंत कोणाही सुट्टया घ्यायच्या नाहीत.२४ तास जनतेसाठी उपलब्ध असलं पाहिजे. शेवटच्या दिवसापर्यंत तो पर्यंत आपण झोपायचं नाही. कोणालाही १५ सप्टेंबर नंतर सुट्ट्या मिळणार नाही. प्रत्येक जण आम्ही अलर्ट मोडवर राहू , असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला
कुठल्याही अवैध धंद्यांबाबत किंवा भेसळबाबत पत्रकार म्हणून आपल्याकडे कोणताही माहिती असल्यास मला माहिती द्या. किंवा माझ्या कार्यालयाला कळवा. मुंबईला अनेक गाड्या गेल्यामुळे 153 फेऱ्या रद्द केल्या होत्या. याबाबत एसटी महामंडळाला 15 सप्टेंबरपर्यंत सगळ्या गाड्या मागवण्याचे आदेश मी दिलेले आहेत. त्याप्रमाणे सगळ्या एसटीच्या गाड्या वेळेत परत येतील. आमचा गणेशोत्सव हा सर्वात मोठा सण आहे, म्हणून उलट आम्हाला ज्यादा कसे बसेस देता येतील ते बघा, अशा सुचना संबंधित अधिका-यांना दिल्या आहेत. सरकारी दवाखान्यांमध्ये मुदत संपलेली औषधे दिली आहे. त्यंच्यावर कारवाई होईल. त्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या कुठल्याही पोषण आहार मध्ये तडजोड होणारच नाही. ही भूमिका सरकारची आहे. पण त्या बाबतीमध्ये संबंधितवर कारवाई पण होणार आणि परत ती चूक होणार नाही एवढीही काळजी आम्ही घेऊ , असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
त्या केळी व्या-याकडे केमीकलयुक्त केळी –
कणकवली बाजारातील केली व्यापा-याच्या वखारीवर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकला . त्यावेळी 2 तासांत केळी पिकवण्याचे प्रशिक्षण वापरत असल्याचे निष्पन झाले आहे.बागवान नावाचा तो केळी व्यापारी आहे. त्याच्याकडूनच शहातील विक्रेत्यांकडे केळी दिली जात आहेत. जे बाहेरचे केळी व फळे विक्रेते आहेत , त्यांच्याकडे खरेदी करताना विचारपूर्वक करावी. पुलाखाली जे फुड स्टॉल आहेत. ते ही घातक आहे. त्या सर्वांवर कारवाई करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. जिल्ह्यात या भेसळीमुळे पोटाचे आजार, ब्लड प्रेशर चे आजार आणि हार्ट अटॅक होण्याचे प्रमाण वाढले आहे. आत्महत्या केलेल्या त्या युवकाच्या शरीरामध्ये ड्रग्स सापडले आहेत. यामध्ये आपली तरुण पिढी बाद होतेय. म्हणून ह्या सगळ्यामध्ये आपली सामूहिक जबाबदारी आहे.मला सिंधुदुर्गला सुरक्षित ठेवणे हे आपल्या सगळ्याजणांचे काम आहे. आपण नुसतं पोलीसांकडे लक्ष देऊ, चालणार नाही. आपण चुकीचे दिसत असेल तर कळवा , त्यावर कारवाई केली जाईल, असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.