सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा २९ सप्टेंबरला

शेअर करा

शेतकरी, व्यापारी, अडते, प्रक्रिया उद्योजकांसह विविध घटकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग,दि.२८ सप्टेंबर

सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सन २०२५-२६ या वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक सहकारी पतपेढी मर्यादित, सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवाराचे बांधकाम सध्या प्रगतिपथावर असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य बाजारपेठ व योग्य भाव मिळण्यासाठी सुसज्ज मुख्य बाजार आवाराची आवश्यकता असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

बाजार समितीच्या आगामी वाटचालीमध्ये शेतकरी, व्यापारी, अडते, प्रक्रियादार तसेच स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांची भूमिका महत्त्वाची असल्याने या सर्व घटकांनी वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व सदस्य यांनी संस्थेचा ठराव घेऊन सभेस उपस्थित राहावे, अशी विनंती करण्यात आली आहे. यापूर्वी नमूद केलेली अट शिथिल करण्यात आली असून, संबंधितांनी कोणताही ठराव न घेता सभेस उपस्थित राहावे, असेही प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीचे जिल्हाध्यक्ष तुळशीदास रावराणे यांच्या वतीने सर्व संबंधितांना या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बाजार समितीच्या विकासासाठी उपस्थिती निश्चितच मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरेल, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

शेअर करा