सिंधुदुर्ग ,दि.११ सप्टेंबर
जिल्ह्यामध्ये कडाक्याची थंडी तसेच अवेळी पावसामुळे आंबा व काजू या फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानुषंगाने नुकसान भरपाई मिळणेकारिता शासनामार्फत आंबा व काजू बागांचे पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. त्याप्रमाणे पंचनामे पूर्ण करून शासनास नुकसानीचा अहवाल सादर करण्यात आलेला होता, त्यानुसार शासनाने आंबा व काजू पिकासाठी नुकसान भरपाई शासन निर्णयाद्वारे मंजूर केली आहे. तसेच सदर पंचनामे पोर्टल ला अपलोड करण्यात आले आहेत. परंतु अपलोड केलेल्या २४५० शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली नसल्याने त्यांना नुकसान भरपाई ची रक्कम प्राप्त झालेली नाही.
तरी याद्वारे आवाहन करण्यात येते कि, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनी आपली ई-केवायसी तातडीने पूर्ण करून घ्यावे, जेणेकरून आंबा व काजू नुकसान आंबा व काजू भरपाई ची रक्कम आपले बँक खात्यावर जमा होईल.