सिंधुदुर्ग : DCS MH मोबाईल ॲपद्वारे शेतकरी स्तरावर पीक नोंदणीची सुविधा

शेअर करा

आजपासून सुविधा उपलब्ध; शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलवरून पीक नोंदणी करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग,दि.११ सप्टेंबर

केंद्र शासनाच्या DCS MH मोबाईल ॲपद्वारे सहाय्यक स्तरावर पीक नोंदणीचे काम ११ ऑगस्ट २०२६ पासून सुरू करण्यात आले आहे. पीक पाहणीचे काम अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने होण्याबरोबरच शेतकऱ्यांची सोय लक्षात घेऊन आता या ॲपमध्ये शेतकरी स्तरावरून स्वतः पीक नोंदणी करण्याची सुविधा ११ सप्टेंबर २०२६ पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या सुविधेमुळे शेतकऱ्यांना आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून DCS MH मोबाईल ॲपमध्ये शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) प्रविष्ट करून आपल्या शेतातील पिकांची नोंदणी करता येणार आहे. शेतकरी ओळख क्रमांकाशी संलग्न असलेल्या सर्व शेतजमिनींची पीक नोंदणी या सुविधेद्वारे करता येणार आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची अचूक आणि वेळेत नोंदणी करणे आवश्यक आहे. पीक नोंदणीची माहिती विविध शासकीय योजना, अनुदान तसेच अन्य शासकीय सेवांचा लाभ देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी DCS MH मोबाईल ॲपचा वापर करून आपल्या शेतातील पिकांची नोंदणी शक्य तितक्या लवकर, तसेच आजच करून घ्यावी, असे आवाहन शासनामार्फत करण्यात आले आहे.

DCS MH ॲप डाउनलोड करण्यासाठी :
“Google Play Store – DCS MH ॲप” (https://reference-url-citation.invalid/0)

दरम्यान, शेतकऱ्यांच्या गरजेनुसार या मोबाईल ॲपमध्ये आणखी सुविधा समाविष्ट करण्यात येणार असून त्याचे अद्ययावत नवीन व्हर्जन लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शेअर करा