सिंधुदुर्ग,दि.१२ ऑगस्ट
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसूल हद्दीतील शासनाच्या सर्व कार्यालयांसाठी सन 2026 करिता तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
त्यानुसार दि. 17 ऑगस्ट – नागपंचमी, दि. 18 सप्टेंबर – ज्येष्ठागौरी पूजन आणि दि. 9 नोव्हेंबर – धनत्रयोदशी (धन्वंतरी जयंती) या दिवशी स्थानिक सुट्टी राहणार आहे. याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी जारी केली आहे.