Sindhudurg : अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना

शेअर करा

सूक्ष्म सिंचनासाठी ९० टक्क्यांपर्यंत अनुदानाची संधी

१५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहिमेचा लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

सिंधुदुर्ग,दि.१४ ऑक्टोंबर

महाराष्ट्र शासनाच्या कृषी आयुक्तालयामार्फत प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना (प्रति थेंब अधिक पीक) अंतर्गत अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी राज्यभर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचनासाठी पूरक अनुदानाचा लाभ मिळणार असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दि. १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविणे, सिंचनासाठी उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे आणि शेतीला शाश्वत पाण्याचा आधार देणे देण्यासाठी पूरक अनुदान उपलब्ध करून देण्यात येते.
अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी (२ हेक्टरपर्यंत) असलेले इतर शेतकरी यांच्यासाठी प्रधानमंत्री कृषी योजनेअंतर्गत ५५ टक्के, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत २५ टक्के व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना / बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत १० टक्के असे एकूण अनुदान ९० टक्क्यांपर्यंत असल्याचे नमूद आहे.
बहुभूधारक शेतकरी (२ हेक्टरपेक्षा अधिक) असलेले शेतकरी यांच्यासाठी प्रधानमंत्री कृषी योजनेअंतर्गत ४५ टक्के, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत ३० टक्के व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना / बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत १५ टक्के असे एकूण अनुदान ९० टक्क्यांपर्यंत असल्याचे नमूद आहे.
जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या सेतू केंद्रात किंवा महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज नोंदणी करावी. योजनेची पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अनुदानाचे प्रमाण व अर्ज प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
जिल्ह्यातील सर्व पात्र व गरजू शेतकऱ्यांनी दि. १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत विशेष मोहिमेचा लाभ घेऊन सूक्ष्म सिंचनाचा अवलंब करावा.

शेअर करा