सकाळी ठीक १० वाजता कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शैक्षणिक संकुलमध्ये आयोजन
कुडाळ, दि. २० जून
कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणेच दहावी-बारावी शालांत परीक्षांचे विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा गुणगौरव व सत्कार सोहळा रविवार दि. २१ जून २०२६ रोजी सकाळी ठीक १० वाजता कुडाळ एमआयडीसी येथील बॅरिस्टर नाथ पै शैक्षणिक संकुलमध्ये संपन्न होणार आहे. यावेळी कुडाळदेशकर ज्ञातीमधील दहावी-बारावी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी तसेच समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे नवनिर्वाचित सदस्य एडवोकेट संग्राम देसाई, कुडाळदेशकर गौड ब्राम्हण संस्था फोंडाघाटचे अध्यक्ष सुरेश सामंत, निवृत्त गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या गुणगौरव कार्यक्रमास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी, पालक व ज्ञातीबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष रणजीत देसाई आणि कार्यवाह प्रशांत धोंड यांनी केले आहे.