सिंधुदुर्ग : राष्ट्रीय एकात्मिक उत्सव मंडळ, नगरपालिका संकुल सावंतवाडी येथे ‘लोकसंवाद-२०२६’ कार्यक्रमाचे आयोजन

शेअर करा

सिंधुदुर्ग,दि.२३ सप्टेंबर

सावंतवाडी येथील राष्ट्रीय एकात्मिक उत्सव मंडळ, नगरपालिका संकुल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आवारात ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमाचे आयोजन (दि.२१ रोजी) करण्यात आले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली. विशेषतः महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली व योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून गणेशोत्सव मंडळे ही केवळ सांस्कृतिक उपक्रमांची केंद्रे न राहता शासकीय माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम ठरत आहेत. यावेळी शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, शासकीय सेवा आणि नागरिकांसाठी उपलब्ध सुविधांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सार्वजनिक गणेश मंडळाने यावेळी वर्षभरात राबविण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली.

यावेळी विश्वास घाग, शैलेश मिस्त्री, गीतेश पोकळे, राजन शृंगारे, सुजित कोरगावकर, महेश केसरकर, अर्चित पोकळे, आनंद भोगण, संदीप कूपवडेकर उपस्थित होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, महिला व बाल विकास अधिकारी बापू शिणगारे, अधीक्षक बी. जी. काटकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या उत्सवाचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यासाठी ‘Bappa.org’ पोर्टलबाबतही यावेळी माहिती देण्यात आली.

शेअर करा