सिंधुदुर्ग : रेडी गावातील वीज समस्यांबाबत अधिक्षक अभियंत्यांना निवेदन

शेअर करा

अधिक्षक अभियंत्याकडून १५ दिवसांत कार्यवाहीचे आश्वासन

सिंधुदुर्ग,दि.०१ जुलै

रेडी गावातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा तसेच वीजवाहिन्यांवरील झाडांच्या फांद्या वेळेत न कापणे , वीज विभागातील कर्मचारी कमतरता तसेच जंगलातून जाणाऱ्या वीजवाहिन्या रस्त्यालगत स्थलांतरित करणे तसेच इतर वीज पुरवठा समस्यांबाबत रेडी येथील लोकप्रतिनिधी ,ग्रामस्थांनी अधिक्षक अभियंत्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
यावेळी,रेडी सरपंच रामसिंग राणे,शिक्षण आरोग्य सभापती प्रितेश राऊळ,उपसरपंच आनंद भिसे,सागर रेडकर,विनोद राणे, माजी सरपंच अनंत कांबळी,राजन राणे,तंटामुक्ती अध्यक्ष वैभव आसोलकर,गोपाळ राऊळ,भूषण सारंग,तुषार साळगावकर आदी उपस्थित होते.
निवेदनात गावातील, वीजपुरवठ्याच्या विविध समस्यांमुळे नागरिक, शेतकरी आणि व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले. पावसाळ्यात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून, तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी अधिक्षक अभियंत्यांनी ग्रामस्थांच्या मागण्यांची दखल घेत संबंधित समस्यांवर १५ दिवसांच्या आत आवश्यक कार्यवाही करून त्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
यावेळी लोकप्रतिनिधी ,ग्रामस्थांनी वीजपुरवठ्याच्या समस्या कायमस्वरूपी सोडवून नागरिकांना सुरळीत व दर्जेदार वीज सेवा उपलब्ध करून देण्याची मागणीही केली.

शेअर करा