Sindhudurg : प्रखर हिंदुत्ववादी नेते तथा मंत्री नितेश राणे यांनी दाखवून दिला प्रखर राष्ट्राभिमान!

शेअर करा

राष्ट्रगीत वंदे मातरम पूर्ण म्हणण्याचे केले आवाहन

सिंधुदुर्ग,दि.१५ ऑक्टोंबर

हलाल प्रमाणपत्र विरोधी कार्यक्रमाच्या “बांदा ते चांदा हिंदू जनजागृती” मोहिमेचा शुभारंभ आज प्रखर हिंदुत्ववादी नेते तथा मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बांदा येथे पार पडला. यावेळी मंत्री नितेश राणे उपस्थितीत हिंदू बंधू आणि भगिनींना मौलिक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या समारोपावेळी गीत उपस्थितांनी म्हटले. यापूर्वी सर्व कार्यक्रमात फक्त पहिली दोन कडवी म्हटली जात असत. मात्र, ऑगस्ट २०२६ मध्ये नवीन कायदा पास करून आता सर्व कार्यक्रमात संपूर्ण सहा कडव्यांचे वंदे मातरम् म्हणणे सक्तीचे करण्यात आले आहे. या मोहिमेच्या समारोप सोहळ्यात “वंदे मातरम”ची पहिली दोन कडवी म्हटली गेली. यावेळी हिंदुत्ववादी नेते नितेश राणे यांनी “वंदे मातरम” गीत
संपूर्ण नवीन स्वरुपात म्हणण्याचा निर्णय घेत सर्व उपस्थिती नागरिकांना तसे म्हणण्यास आवाहन केले. यावेळी मोबाईलमधून “वंदे मातरम” ऐकून सर्वांनी गीत म्हटले. या उदाहरणावरून राष्ट्राभिमान कसा असावा , तो आपल्या अंगीकृत कसा कसा करणे आवश्यक आहे हे प्रखर हिंदुत्ववादी नेते तथा मंत्री नितेश राणे यांनी दाखवून दिले. आजच्या युवापिढीसाठी प्रखर राष्ट्राभिमानाचे उदाहरण मंत्री नितेश राणे यांनी या कार्यक्रमातून दाखवून दिले.


शेअर करा