सिंधुदुर्ग,दि.२० सप्टेंबर
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या ओरोस येथील शासकीय निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे आमदार निलेश राणे यांनी मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी आमदार निलेश राणे यांनी श्री गणरायाची पूजा करून जिल्ह्यातील नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी तसेच सर्वांच्या आरोग्य आणि कल्याणासाठी प्रार्थना केली. गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, विविध मान्यवरांकडून गणरायाचे दर्शन घेतले जात आहे.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल उपस्थित होते. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या निवासस्थानी गणरायाच्या दर्शनासाठी आलेल्या आमदार निलेश राणे यांचे स्वागत करण्यात आले.