सिंधुदुर्ग,दि.१२ ऑगस्ट
सन 2025-26 करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार तसेच डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी तसेच पात्र ग्रंथालय कार्यकर्ता व सेवकांनी पुरस्कारासाठीचे प्रस्ताव तीन प्रतीमध्ये दि. 25 सप्टेंबर 2026 पर्यंत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे सादर करावेत. जिल्ह्यातील शासनमान्य ग्रंथालयांनी पुरस्कारासाठीचे प्रस्ताव विहित नमुन्यात व आवश्यक कागदपत्रांसह मुदतीत सादर करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.