सिंधुदुर्ग जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी; वैभववाडी व कुडाळमध्ये सर्वाधिक वर्षाव

शेअर करा

सिंधुदुर्ग,दि.२९ जून


सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी (दि. 29 जून) पावसाने जोरदार हजेरी लावत अनेक भागांना चांगलेच झोडपून काढले. जिल्ह्यात आज सरासरी 52.37 मिमी पावसाची नोंद झाली असून, वैभववाडी आणि कुडाळ तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला.

आजच्या पावसाची तालुकानिहाय नोंद पुढीलप्रमाणे –

देवगड – 47 मिमी

मालवण – 50 मिमी

सावंतवाडी – 20 मिमी

वेंगुर्ला – 15 मिमी

कणकवली – 59 मिमी

कुडाळ – 92 मिमी

वैभववाडी – 98 मिमी

दोडामार्ग – 38 मिमी

वैभववाडीमध्ये 98 मिमी तर कुडाळमध्ये 92 मिमी पावसाची नोंद झाल्याने या भागातील नदी-नाले आणि ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्याच्या इतर भागांतही अधूनमधून जोरदार सरी कोसळत असून शेतीच्या कामांना वेग आला आहे.

हवामान विभागाने पुढील काही दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली असून, नदीकाठच्या तसेच सखल भागातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

शेअर करा