सिंधुदुर्ग : श्रमदानातून स्वच्छता’ उपक्रमात संत निरंकारी मिशनने घेतला सहभाग

शेअर करा

जिल्ह्यातील १८ ठिकाणी राबवली स्वच्छता मोहीम ; जिल्हा परिषदच्या मोहिमेला लागला हातभार

सिंधुदुर्ग,दि.०६ जुन
निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आदेशानुसार संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने झोन चिपळूण 40 मधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संत निरंकारी स्वयंसेवकांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ने राबवलेल्या श्रमदानातून स्वच्छता या अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेऊन 18 ठिकाणी स्वच्छता अभियान राबविले.त्यामुळे जिल्हा परिषदच्या स्वच्छता मोहिमेला मोठा हातभार लागला आहे.

ग्रामीण भागातील स्वच्छतेचा दर्जा सुधारण्यासाठी आणि स्वच्छतेची एक लोकचळवळ निर्माण करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन यांच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात विशेष ‘श्रमदानातून परिसर स्वच्छता’ मोहीम राबविण्यात आली होती. या कार्यक्रमात जिल्हावासियांनी तसेच सेवाभावी संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत ‘संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन’ या प्रशासकीय मानव कल्याणाच्या उपक्रमात सहभागी झाले.

जिल्ह्यातील एकूण १८ ग्रामीण व शहरी ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले त्यामध्ये संत निरंकारी फाउंडेशनच्या शेकडो स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. यावेळी देवगड येथील उपजिल्हा रुग्णालय (देवगड) प्राथमिक आरोग्य केंद्र (मोंड), प्राथमिक आरोग्य केंद्र (तिर्लोट), कणकवली तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय (कणकवली), प्राथमिक आरोग्य केंद्र (फोंडाघाट ) जिल्हा परिषद शाळा (वारगाव), ग्रामपंचायत (नांदगाव), कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा (आंदुर्ले ), तुळसुली तिठा (तुळसुली), जिल्हा परिषद शाळा (आकेरी), ओरोस फाटा, छ.शिवाजी महाराज चौक (ओरोस), मालवण तालुक्यातील चिवला बीच (मालवण), वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामपंचायत तळवडे (मातोंड), ग्रामपंचायत (पेंडुर-घोडेमुख), सावंतवाडी मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र (ओटवणे ), प्राथमिक आरोग्य केंद्र (इन्सुली), ग्रामपंचायत (निरवडे), दोडामार्ग मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (उपस) आदी ठिकाणी परिसराची स्वच्छता करताना आली.

संत निरंकारी मिशन सातत्याने आध्यात्मिक जागृतीबरोबरच मानवतेच्या सेवेत सातत्याने समर्पित आहे. या सेवांमध्ये मुख्यत्वे ‘अमृत प्रोजेक्ट’-जल साठ्यांचे संरक्षण, ‘वननेस वन’-वृक्षारोपण, तलासरी – सिमेंट नाला बांध (सीएनबी) परियोजना, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिरांचे आयोजन इत्यादिंचा समावेश आहे. या व्यतिरिक्त समाजोत्थानासाठी महिला सशक्तीकरण, युवाशक्तीला सकारात्मक मार्गदर्शन यासाठी विविध कल्याणकारी परियोजना राबवित आहे

शेअर करा