सिंधुदुर्ग : सत्यविजय डामरे व मीना तागडकर यांना बेस्ट टीचर्स अवॉर्ड

शेअर करा

सिंधुदुर्ग,दि.१२ सप्टेंबर

लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३१ ए-१ लायन्स क्लब ऑफ मिड्टाउन एलवाय २०२६-२७ यांच्यावतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा बेस्ट टीचर्स अवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये के. एम. एस. डॉ. शिरोडकर हायस्कूल, परेल, मुंबई-१२ येथील शिक्षक सत्यविजय नारायण डामरे तसेच ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापिका मीना विजय तागडकर यांना यावर्षीचा ‘बेस्ट टीचर्स अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमात लायन्स इंटरनॅशनल क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर तथा मुंबईचे माजी नगरपाल जगन्नाथ हेगडे यांच्या हस्ते सत्यविजय नारायण डामरे ,मीना विजय तागडकर यांना ‘बेस्ट टीचर्स अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला.

या सन्मानामुळे के. एम. एस. डॉ. शिरोडकर हायस्कूल तसेच ज्युनिअर कॉलेजच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या दोन्ही शिक्षकांच्या कार्याचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. या पुरस्काराबद्दल सत्यविजय नारायण डामरे , मीना विजय तागडकर यांचे सर्व स्तरातून हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

शेअर करा