सिंधुदुर्ग : मुंबईतील कोकणवासीयांसाठी ‘शिवसेना एक्सप्रेस’

शेअर करा

गणेशोत्सवासाठी कुडाळ-मालवणला मोफत रेल्वे प्रवास ; शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या वतीने आयोजन..

सिंधुदुर्ग ,दि.१३ ऑगस्ट

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वास्तव्यास असलेल्या कोकणवासीयांसाठी यंदा खास मोफत गणेशोत्सव रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवसेना आ.निलेश राणे यांच्यावतीने ‘शिवसेना एक्सप्रेस’ या विशेष रेल्वे प्रवासाचे आयोजन करण्यात आले आहे.मुंबईतील कोकणवासीयांना गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जाता यावे, यासाठी आमदार निलेश राणे यांच्या वतीने शिवसेना एक्सप्रेस उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या विशेष रेल्वेचा प्रवास दादर ते कुडाळ असा होणार असून, १२ सप्टेंबर २०२६ रोजी, शनिवारी सकाळी १० वाजता दादर येथून रेल्वे सुटणार आहे. गणरायाच्या आगमनासोबत ढोल-ताशांच्या गजरात गावाकडे जाण्याचा आनंद कोकणवासीयांना घेता येणार आहे.

या मोफत रेल्वे प्रवासासाठी आगाऊ बुकिंग करणे आवश्यक आहे.त्यासाठी मोबाईल क्रमांक ८४२५९०१२०२,८४२५९०१५४५ यावर बुकिंगची सुविधा सोमवार ते शनिवार सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध असल्याचे आयोजकांनी कळविले आहे. कुडाळ व मालवण तालुक्यातील प्रवाशांसाठी मतदान ओळखपत्र व आधार कार्ड अनिवार्य असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

या उपक्रमाचे आयोजन कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश नारायण राणे यांच्या वतीने करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतून मोठ्या संख्येने कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळावा आणि त्यांना सुरक्षित व सुलभ प्रवासाची सुविधा मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

मोफत रेल्वे प्रवासाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक कोकणवासीयांनी वेळेत बुकिंग करून आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

शेअर करा