सिंधुदुर्ग : ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अधिकृत कॉलिंग क्रमांक निश्चित

शेअर करा

मार्केटिंगसाठी 1409345238, तर सेवा व कर्जवसुलीसाठी 1600312838 क्रमांकावरूनच संपर्क; अनधिकृत कॉलपासून सावध राहण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग ,दि.१३ ऑगस्ट

ग्राहकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विविध प्रकारच्या दूरध्वनी संपर्कासाठी अधिकृत क्रमांक निश्चित केले आहेत. त्यामुळे बँकेच्या नावाने येणाऱ्या कॉलची खातरजमा करण्यासाठी ग्राहकांनी या क्रमांकांची नोंद ठेवावी, असे आवाहन बँक प्रशासनाने केले आहे.

मार्केटिंग व प्रचारासाठी 1409345238

बँकेच्या विविध योजना, नवीन उत्पादने, ऑफर्स तसेच प्रचारात्मक माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 1409345238 हा अधिकृत क्रमांक निश्चित करण्यात आला आहे. बँकेच्या मार्केटिंग विभागामार्फत ग्राहकांशी या क्रमांकावरूनच संपर्क साधला जाणार आहे.

सेवा व कर्जवसुलीसाठी 1600312838

ग्राहक सेवा, कर्जवसुली तसेच बँकेच्या दैनंदिन कामकाजाशी संबंधित विविध बाबींसाठी 1600312838 हा अधिकृत क्रमांक निश्चित करण्यात आला आहे. थकीत कर्जाची माहिती, परतफेडीचे पर्याय, KYC, Dormant Reactive यांसारख्या सेवांसंदर्भात ग्राहकांशी या क्रमांकावरून संपर्क साधला जाणार आहे. हे कॉल AI तसेच Dialer प्रणालीद्वारे करण्यात येतात.

संशयास्पद कॉलपासून सावध राहा

ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी बँकेशी संबंधित दूरध्वनी संवाद अधिक सुरक्षित व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने हे अधिकृत क्रमांक निश्चित करण्यात आले आहेत. ग्राहकांनी बँकेच्या नावाने येणाऱ्या अनधिकृत किंवा संशयास्पद कॉलपासून सावध राहावे. कोणत्याही कॉलवर वैयक्तिक किंवा बँकिंगविषयक संवेदनशील माहिती देण्यापूर्वी संबंधित क्रमांकाची खातरजमा करावी, असे आवाहन बँकेकडून करण्यात आले आहे.

बँकेशी संबंधित कॉल असल्यास 1409345238 हा मार्केटिंगसाठी आणि 1600312838 हा सेवा व कर्जवसुलीसाठी अधिकृत क्रमांक असल्याची नोंद ग्राहकांनी ठेवावी, असेही बँक प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

शेअर करा