सिंधुदुर्ग : ४० पट नजराणा आकारणीची तरतूद वगळण्यात आल्याबाबत विशेष मोहिम

शेअर करा

सिंधुदुर्ग,दि.०४ सप्टेंबर

कुडाळ तालुक्‍यातील सर्व संबंधित नागरिक, जमीनधारक, कुळ व लाभार्थी यांना याद्वारे जाहीर करण्यात येते की, महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनियम, २०२६ अन्वये महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९४८ चे कलम ४३ च्या पोटकलम (१) मधील दुसऱ्या परंतुकाखालील खंड (क), हैदराबाद कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९५० चे कलम ५०-ब मधील पोटकलम (१) मधील परंतुकाखालील खंड (क) तसेच महाराष्ट्र कुळवहिवाट (विदर्भ प्रदेश) अधिनियम, १९५८ चे कलम ५७ मधील पोटकलम (१) मधील परंतुकाखालील खंड (क) वगळण्यात आलेले आहेत.

​त्यामुळे, कायद्यांतील तरतुदींनुसार कुळ कायद्यांतर्गत जमीन प्राप्त झाल्यानंतर विहित १० वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधित जमिनीच्या हस्तांतरणास/व्यवहारास परवानगी देताना महसूल आकारणीच्या ४० पट नजराणा आकारण्याची तरतूद यापुढे लागू राहणार नाही.

​या अनुषंगाने, जिल्ह्यात कुळवहिवाट व शेतजमीन कायद्याच्या तरतुदींन्वये प्राप्त झालेल्या जमिनींबाबत प्रलंबित प्रकरणे तसेच पात्र प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.

​या विशेष मोहिमेअंतर्गत संबंधित जमीनधारक/कुळ/लाभार्थी यांनी त्यांच्या जमिनीबाबतची आवश्यक कागदपत्रे व अर्ज तहसील कार्यालय कुडाळ यांचे कार्यालयात सादर करून या संधीचा लाभ घ्यावा.

​सर्व संबंधित महसूल अधिकारी/कर्मचारी यांनी महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनियम, २०२६ मधील सुधारित तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी व पात्र प्रकरणांमध्ये ४० पट नजराणा आकारणी करू नये, याची दक्षता घ्यावी.
​सदर विशेष मोहिमेचा सर्व संबंधित नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

शेअर करा