सिंधुदुर्गातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोडसह कोकणातील अनेक स्थानकांवर थांबा
सिंधुदुर्ग ,दि.१९ सप्टेंबर
गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मडगाव जंक्शन ते पनवेल आणि पनवेल ते मडगाव जंक्शनदरम्यान अतिरिक्त विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ट्रेन क्रमांक 01112 मडगाव जंक्शन-पनवेल विशेष गाडी रविवार, २० सप्टेंबर आणि २७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता मडगाव जंक्शनहून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता पनवेलला पोहोचेल.
तर ट्रेन क्रमांक 01113 पनवेल-मडगाव जंक्शन विशेष गाडी सोमवार, २१ सप्टेंबर आणि २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता पनवेलहून सुटेल. त्याच दिवशी रात्री ११.५५ वाजता ही गाडी मडगाव जंक्शनला पोहोचणार आहे.
या विशेष गाड्यांना करमाळी, थिवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा आणि पेण या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
या गाड्यांमध्ये एकूण २१ एलएचबी डबे असतील. यामध्ये फर्स्ट क्लासचा १ डबा, एसी टू टियरचे २, एसी थ्री टियरचे ४, एसी थ्री टियर इकॉनॉमीचे २, स्लीपरचे ६ आणि जनरलचे ४ डबे असतील. याशिवाय एसएलआर/डी आणि जनरेटर कार प्रत्येकी एक असे डबे असतील.
गणपती उत्सवाच्या काळातील अतिरिक्त प्रवासी गर्दी लक्षात घेता प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.