सिंधुदुर्ग: पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत

शेअर करा

सिंधुदुर्ग,दि.१३ ऑगस्ट

इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ‘पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना’ राबविण्यात येत आहे. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी बारावीनंतर पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे.

योजनेसाठी दि. 12 ऑगस्ट 2026 पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रांची एक प्रत सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सिंधुदुर्ग या कार्यालयात जमा करावी.   

शेअर करा